भोर नगरपालिका निवडणुक ! जनतेनं उभा केलेला उमेदवार !! मयुर भिसे प्रभाग क्रमांक ६ मधून रिंगणात
भोर : भोर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये समाजहिताचं भान ठेवणारा आणि नागरिकांचा विश्वास संपादन केलेला युवक मयुर अरुण भिसे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, मयुर भिसे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांच्या कार्यामुळेच लोक त्यांना आपला उमेदवार म्हणून पुढे करत आहेत.
मयुर भिसे हे गेल्या दहा वर्षांपासून वेताळपेठेतील ‘झुंजार मित्र मंडळा’चे अध्यक्ष म्हणून सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी उपक्रमांत सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला आहे.
तसेच नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदत, स्थानिक प्रश्नांवरील तोडगे आणि परिसरातील बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन अशा उपक्रमांमुळे ते जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करू शकले आहेत.
सामाजिक सलोखा जोपासण्याची तळमळ आणि कार्यनिष्ठा हीच त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी “आमच्या घरचा उमेदवार” म्हणून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. परिसरातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या पाठिशी उभे राहिले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मयुर भिसे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे.
मदतीस तत्पर, नेहमी लोकांसाठी उपलब्ध आणि लोकांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणारा चेहरा म्हणून मयुर भिसे हे प्रभाग ६ मधून आता औपचारिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.




