राजकीय

भोर विधानसभा मतदारसंघात संग्राम थोपटेंची प्रचारात आघाडी ; दिपावलीच्या शुभेच्छा देत नागरिकांची साधला संवाद


गुंजन-मावळ : भोर विधानसभा मतदारसंघाच्या रणसंग्रामात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी आजच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात भोर तालुक्यातील सिल्वर जुबली स्टार सिनेअभिनेते दादा कोंडके यांच्या इंगवली गावापासुन सुरुवात केली, त्यानंतर आळंदे, कासुर्डी, तेलवडी, मोहरी, हातवे, तांभाड, दीडघर, पारवडी, सोनवडी, गो-हेपडळ, सांगवी, कुरुंगवडी, कोळवडी, जांभळी या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

वीर धरण प्रकल्प अंतर्गत समाजमंदिर, काँक्रीटरस्ते, पाणीपुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, 2515, 3054, 5054 अंतर्गत निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हरिश्चंद्री ते तेलवडी हा बंधारा मंजूर झाला आहे, यामुळे या भागातील शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल व या बंधाऱ्यावरून चार चाकी वाहने जाण्यासाठीचा रस्ता देखील करण्यात येणार आहे, तसेच जांभळी येथील बांधाऱ्याचे देखील काम सुरु आहे, PMRDA अंतर्गत त्याठिकाणी 45 लाख रुपयेचा निधी रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे.

Advertisement

कासुर्डी येथील WOM या कंपनीच्या व्यवस्थापना संदर्भात काही अडचणी असल्यामुळे ते काम थांबले असून या ठिकाणी साधारणता दोन हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याकारणाने त्यासंदर्भात विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. कासुर्डी-हातवे-तांभाड रस्त्याचे काम मार्गी लावले आहे,

कार्यक्रमाच्या वेळी कासुर्डी गावचे उपसरपंच तुकाराम उरणकर यांच्यासह गणेश पांडुरंग मालुसरे, सोमनाथ दगडे, बळीराम मालुसरे, नामदेव देवकर यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला या सर्वांचे अभिनंदन करुन पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, लहूनाना शेलार, मदन खुटवड, सोमनाथ वचकल, अरविंद सोंडकर, किशोर बांदल, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!