ताज्या घडामोडी

भोर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण सोडत निकाल जाहिर 


भोर : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी भोर तालुक्यातील विविध गणाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार दि.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. आरक्षण सोडतीमुळे आता अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून काहींचे पत्ते कट झालेत. त्यात सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव असल्याने कोणत्या पंचायत समिती गणामध्ये महिला सदस्यास सभापती पदाची संधी मिळते ते पहावे लागेल.

पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अभिजीत मंगल कार्यालयात ही सोडत पार पडली. चिठ्या काढण्याचा मान लहान मुलीना मिळाला.

आरक्षण आणि गण पुढील प्रमाणे

Advertisement

१) नसरापूर – सर्वसाधारण
२) वेळू – सर्वसाधारण
३) कामथडी – सर्वसाधारण (महिला)
४) भोंगवली – सर्वसाधारण
५) भोलावडे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
६) शिंद- सर्वसाधारण (महिला)
७) उत्रोली- सर्वसाधारण (महिला)
८) कारी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )

भोर पंचायत समितीचा सभापती हा कामथडी, शिंद, उत्रोली व कारी हे गण सभापती पदाचा चेहरा ठरणार आहेत.

हा संपूर्ण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत पारदर्शकपणे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता उमेदवारांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या सोडतीस सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!