रस्त्यावर चालणारा प्रत्येक जण गुन्हेगार नाही : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी एका वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मिनाक्षी गुरव उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
महापालिका तसेच विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक विषय सुधारणा करण्यात येत आहेत. पुणे शहरात विविध वाहतूक विषयक कामे तसेच पायाभूत सुविधांसाठी पोलिसांना 1000 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. नवीन भरती प्रक्रियेतील. 800 पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी 435 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. नवीन 7 पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहेत, वाहतूक शाखा म्हणजे पुणे पोलिसांचा जनसंपर्क कक्ष आहे. रस्त्यावरून जाणारा वाहनचालक किंवा नागरिक गुन्हेगार नाही. याची जाणीव पोलिसांनी ठेवावी. कारवाई करताना वादाचे प्रसंग टाळावेत. नागरिकांविषयी सौजन्याने वागावे असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिले.




