सामाजिक

भोर तालुक्यात स्वयंदीप फाउंडेशनच्या माध्यमांतून गरजु विद्यार्थांना शालेय वस्तु वाटप.


“धांगवडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा kधांगवडी,ता. भोर जि. पुणे. दिनांक 17/8/2024 ( शनिवार) रोजी स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्यामुळे धांगवडी, किकवी,केंजळ, कांबरे खे. बा, महुडे खुर्द, महुडे बुद्रुक या गावातील इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या 110 विद्यार्थ्यांनाआज स्वयंदिप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी वानखेडे यांच्या हस्ते, सुनंदा गायकवाड यांच्या उपस्थितीत,सरपंच नवनाथ कदम यांच्या प्रयत्नाने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

स्वयंदीप सोशल फाउंडेशनने सुरू केलेल्या ” होप प्रोजेक्ट ” चा जवळ-जवळ 18 वा टप्पा नुकताच पूर्ण केला. यात पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यातील गावांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या गरजा पाहुन शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहेत. या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या पुणे टीमने नुकतेच भोर तालुक्यातील गावांमध्ये सुमारे 306 विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप केले. शिवाय भविष्यात विद्यार्थ्याच्या इतर कलागुणांना वाव देण्यासाठी क्रिडा,कला,सांस्कृतिक तसेच क्राफ्ट, चित्रकला, यांचेही कॅम्पचे आयोजन केल्यास शक्य असेल ती सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Advertisement

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सरपंच नवनाथ कदम यांनी सांगितले ज्या प्रमाणे फाउंडेशनच्या माध्यमातुन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आहे त्या प्रमाणे तुम्ही सुध्दा भविष्यात गरजू मुलांच्या पाठीशी रहा असे आवाहन करण्यात आले, शिका, संघटीत व्हा, सहर्ष करा ही बाबासाहेब आंबेडकर शिकवन कायम लक्षात ठेवली पाहिजे, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो पिल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, तुम्ही सर्वानी चांगले शिक्षण घ्या, अधिकारी बना जेणेकरून तुम्हीही इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करु शकाल,

यावेळी विद्यमान सरपंच नवनाथ कदम, RPI एकतावादी कार्याध्यक्ष सुनील मोरे, सचिन कदम, नयन कदम, रुपाली कदम, सुजाता कदम, दत्तात्रय गोलाने गुरुजी, उपसरपंच, नितीन मोरे धम्मांकुर प्रतिष्ठान उपाध्यक्ष, सुनील जाधव धांगवडी शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ गोलाणे, जयेश आगवणे,सिध्दार्थ गोलाणे, केंजळ येथील,महेंद्र कांबळे, सतीश कांबळे, दादासाहेब शेलार, कोंढाळकर, महुडे खुर्द येथील विकास सोसायटीचे चेअरमन नथुराम गायकवाड, व पो.पाटील,अमित गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!