क्राईम

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरूणाची आत्महत्या ; कुंटुबियांचा आरोप


 

सारोळा : भोर तालुक्यातील पूर्व भागातील न्हावी गावातील एका तरुणाने शिरवळ पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे ( वय 22 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, अजयच्या कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातुन कंपनीच्या गेटवर एका तरुणाची निघृण हत्या करण्यात आली होती, अमर शांताराम कोंढाळकर (वय 22, रा. वडवाडी, ता. खंडाळा) या तरूणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय 19, रा. गुणंद, ता. भोर) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली होती.

Advertisement

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी सोबत कंपनीत काम करणाऱ्या इतर तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी केली जात होती. त्यावेळी मयत अजय तुकाराम शिंदे यालाही पोलिसांनी चौकशीसाठी दि. 17 फेब्रुवारी 2025 (सोमवार) रोजी बोलवले असता अजय शिंदे आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला असता पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पोलिसांकडून त्यास जबर मारहाण झाली होती,  संध्याकाळी 7 वाजता त्याला सोडण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, तो घरी आला तेव्हा त्याचे हात-पाय सुजलेले होते, व तो घाबरलेला दिसत होता, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते ना चालायला येत होते, तो मेंटली डिस्टप झालेला होता.

अजय शिंदेच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या मारहाणीच्या भीतीमुळेच अजयने आपल्या राहत्या घरी आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे सांगितले,या घटनेनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि दबावामुळेच अजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!