पुरंदरचा मराठमोळा रुतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग संघाच्या कर्णधारपदी निवड
आयपीएलचा नवीन हंगाम 22/03/24 सायंकाळी 7 : 00 वाजता सुरू होत असुन पहिला सामना चेन्नई विरुध्द बेंगलोर या संघामध्ये आहे.
चेन्नई सुपर किंग संघाने आयपील सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर संघचा कर्णधार म्हणुन रुतराज गायकवाडच्या नावाची मोठी घोषणा करुन क्रिकेट प्रेमीना धक्काच दिला,
रुतराज मुळचा पारगांव-मेमाणे ता.पुरंदर जि. पुणे येथील रहिवाशी असुन तो 2019 मध्ये चेन्नई संघात सहभागी झाला होता, प्रत्येकशात 2020 च्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली या हंगामात त्याने सलग 3 वेळा सामनाविर पुरस्कार मिळवला आणि त्याचं हंगामात चेन्नई संघाने 4 थ्या वेळेस आयपीलची ट्रॅफी जिंकली, तेव्हापासुन तो चेन्नई संघसाठी योगदान देत आहे.
रुतराजची चेन्नई संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने त्याच्या मुळ गावी ग्रामस्थांनी व क्रिकेट प्रेमींनी पेढे वाटुन फटाके फोडुन आनंद साजरा केल.




