पुणेकरांचा भारताच्या लष्कराच्या पराक्रमाला सलाम ! भर पावसात तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नितीन साबळे,
डेक्कन जिमखाना, पुणे.
पुणे : दि. १८ मे (रविवार) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रकरणी पुण्यामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली होती, या रॅलीमध्ये शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला, शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी रविवारी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली चालु असताना पावसाने हजेरी लावली तरी देखील नागरिकांनी रॅलीमध्ये मोठ्यप्रमाणावर सहभाग घेतला.
नागरिकांनी हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, वीर जवान तुझे सलाम, दहशतवाद मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये महिला भगिनी, वृद्ध, युवक-युवती राजकीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होता, डेक्कन जिमखानामधिल छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली व ज्ञानेश्वर पादुका चौकात या रॅलीची सांगता सभा झाली.
तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, आमदार सुनील कांबळे, आमदार योगेश टिळेकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त वसंत गोखले, मनोज एरंडे, शरद केळकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त रेखा भिडे आणि मनोज पिंगळे हे क्रीडापटू, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, सुभाष जंगले, राहुल भंडारे, प्रमोद कोंढरे, वर्षा तापकीर, गणेश कळमकर, रवींद्र साळेगावकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




