नवसह्याद्री गुरुकुल स्कूलच्या मुलींचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत डंका
भोर : दि. 14/9/24 (शनिवार) क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा क्रिडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापुर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये 19 वर्ष वयोगटामध्ये नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगावच्या मुलींनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे क्रिडा शिक्षक समीर शेख मुख्याध्यापिका सौ.वर्षा धुमाळ आदींचे मार्गदर्शन लाभले. कु.गायत्री जाधव,कु.सृष्टी जाधव, कु.आलिशा फणसे,कु.भाग्यश्री जांगिड, कु.अक्षया अपलवर, कु.सेजल भोर्डे, कु.आर्या निगडे,कु. सिद्धी मरळ, कु.अनुष्का माने, कु.तेजल मांढरे, कु.गिरिजा निगडे, या मुलींनी चमकदार कामगिरी करत आपल्या शाळेच्या संघाला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून शाळेच्या या मुलींचे संघाला जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मिळणार आहे.




