एस टी (ST) बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम बसवली जाणार ; बसचे लोकेशन समजणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास 10 हजार गाड्यांना ही यंत्रणा बसविली असून त्याची सद्यःस्थिती पाहून उर्वरित गाड्यांनाही ती यंत्रणा बसविली जाणार आहे, नववर्षात एसटीच्या सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक बसगाडीचे लोकेशन दिसेल त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे, अशी माहिती डॉ.माधव कुसेकर (व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) यांनी दिली.
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे पुढीप्रमाणे असतील.
• महामंडळाचे एम.एस.आर.टी.सी. ॲप अँन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करावे लागणार आहे.
• महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल ही माहिती ॲपवरुन समजणार आहे.
• गुगल मॅपवरुन समजणार बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही.
• हात करूनही बस थांबली नाही तर प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची ॲपवरुन खात्री करता येईल.
• एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांचीही चिंता दूर होणार आहे, व त्यांना वेळेचा अंदाज येईल.
आपले नातेवाईक माझी मुलगी-मुलगा, आजी-आजोबा, आई-वडील एस टी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरवरील ठिकाणावरून येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही, ते कुठपर्यंत आले असतील, ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे दूर होणार आहे. बसची वाट पाहात तासन्तास बस स्थानकावर देखील थांबावे लागणार नाही. कोणत्या मार्गावरील, कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती आता त्या अॅपद्वारे घरबसल्या समजणार आहे.
एसटी बसने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत होत आहे.




