आग्रा ते राजगड 1253 किलोमिटरचा प्रवास करुन शिवज्योत किल्ले रायरेश्वराकडे रवाना
कापूरहोळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 17 ऑगस्ट 1666 रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे 14 वे वंशज पेशाने वकील असणारे मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा ते राजगड गरूडझेप मोहीम सालाबादप्रमाणे यंदाही राबविण्यात आली,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा ज्वलंत इतिहास पोहोचवण्यासाठी हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळ्यांनी आग्रा ते राजगड तब्बल 1253 किलोमीटरचे अंतर 17 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024 च्यादरम्यान 13 दिवसांमध्ये धावत पूर्ण केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार तरुणांपर्यंत पोहोचविणे,बुध्दिचातुर्याने अनेक संकटांवर मात करत, अवघे नऊ वर्षे वयाच्या शंभुराजांना मथुरेत ठेवत, तापी-नर्मदा-गोदावरी नद्यांचे अथांग पात्र पार करत राजगडावर सुखरुप पोहोचले होते. शिवाजी राजांच्या या इतिहासाला मानवंदना देण्यासाठी, भोर तालुक्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा लोकांपर्यंत पोहचवण्याकरीता आम्ही हा प्रवास करत आहोत असे आग्रा ते राजगड मोहिमेचे प्रमुख मारुती गोळे यांनी सांगितले.
तसेच आपल्या भोर भागाला लाभले ऐतिहासिक पाश्वभूमी पहाता मावळ्यांनी याचा आदर्श घ्यावा म्हणुन राजगड ते रायरेश्वर अशी 2 दिवसाची पायी शिवज्योत मोहिम राबवण्यात येतीय, 29 ऑगस्ट रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभुमी मध्ये शिवज्योती दरवर्षीप्रमाणे स्वागत करण्यात आले व सर्व शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात आला तसेच रायरेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व शिरदारांचे स्वागत करण्यात आले, गणेश उपाळे यांच्या राजगड (वेल्हा) तालुक्यातील एकमेव असलेली लोकार्पण अकॅडमी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या शिवज्योत मध्ये सहभागी होत्या त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने व वीर धाराऊ माता गाडे स्मारक समितीचे अध्यक्ष अमित गाडे यांनी स्वागत केले.गावातील नागरिकांनी स्वागत करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ या जयघोषांनी कापूरहोळ परिसर दुमदुमून निघाला होता.
यावेळी धाराऊ माता स्मारक समितीचे आध्यक्ष अमित गाडे, बाबुराजे गाडे,मयुर गाडे, गोरक्ष आहिरे,पांडुरंग गाडे, अक्षय गाडे, सचिन वीर, आमर गाडे, प्रवीण देवघरे. सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.




