भारत बंदच्या आव्हानाला कापूरहोळ येथील व्यवसायिकांकडुन प्रतिसाद
कापूरहोळ : सर्वोच्च न्यायालयाने SC व ST आरक्षणात क्रिमीलेयर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी, यासाठी हा निर्णय देण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. दलित संघटनांकडून या निर्णयाला विरोध केला जातो आहे. हा एक प्रकारे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. याविरोधात संघटनांकडून 21/08/24 (मंगळवार) रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला उत्तम असा प्रतिसाद मिळाला.
मा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC व ST आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलियर लागू करण्याच्या विरोधात SC, ST समूह व भीम आर्मी च्य वतीने संपूर्ण भारतात भारत बंदच्या आंदोलनास पाठिंबा दिला होता, या अनुषंगाने कापूरहोळ तालुका भोर येथे व्यवसायिकांनी भारत बंदच्या आव्हानाला प्रतिसाद दिला होता, भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह भीम आर्मीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे, पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शेलार,भोर वेल्हा मुळशी चे अध्यक्ष महेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली भोर वेल्हा मुळशी चे उपाध्यक्ष डँशिंग युवानेतृत्व सागर भाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या कापूरहोळ बाजार पेठ बंद करण्यात आली व्यापारी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात बंद मध्ये सहभागी झाले होते.
महत्त्वाचे म्हणजे भारत बंद संदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नव्हती, मात्र यादरम्यान दवाखाने आणि औषधांची दुकाने यासारख्या आपातकालिन सेवा, दुध डेअरी, याशिवाय बँका, सरकारी कार्यालये, शाळा, या बंद मधुन वगळण्यात आल्या होत्या.
या भारत बंदला अनुसुचित जाती-जमाती, विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता, न्यायालयाच्या अन्यायकारक निर्णयावर प्रकाश टाकणे हा “भारत बंद” चा उद्देश होता.




