ताज्या घडामोडी

फलटणच्या २७ वर्षीय डॉक्टरची मुंबईत आत्महत्या ! मानसिक छळ व राजकीय दबाव !! तळहातावरील संदेशातून गंभीर आरोप


सातारा, प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील २७ वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांचा आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुंबईतील सायन येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणात कथित मानसिक छळ, वरिष्ठांकडून दबाव तसेच राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

डॉ. रुपनवर यांनी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये तसेच हातावर लिहिलेल्या संदेशात काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप केल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीकडून दबाव आणला जात असल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

घटनेची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित सर्व बाजूंचा तपास सुरू आहे.

“कायद्यासमोर सर्व समान असून, तपासात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर प्रभावाची पर्वा न करता कठोर कारवाई केली जाईल,” असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घटनेने वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण व प्रशासकीय दबावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!