ताज्या घडामोडी

भोर नगरपरिषदेच्या ८.८० कोटींच्या विकासकामांना स्थगिती ! शहर विकासाला ब्रेक


भोर : भोर नगरपरिषदेच्या तब्बल ८ कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकासकामांना जिल्हाधिकारी स्तरावर स्थगिती मिळाल्याने शहराच्या विकास प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अडथळ्यांच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Advertisement

यावेळी युवक अध्यक्ष पार्थ रावळ, ओबीसी सेल अध्यक्ष राजेश शिंदे, समीर घोणे व विक्रम शिंदे उपस्थित होते. विठ्ठल शिंदे म्हणाले की, नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात शहरातील विविध विकासकामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या कामांना स्थगिती मिळावी यासाठी भाजपचे गटनेते व उपनगराध्यक्ष यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचा दावा त्यांनी केला.

३० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत संबंधित ठराव मांडण्यात आले होते. मात्र, भाजपच्या १६ नगरसेवकांनी विषय स्थगित ठेवल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. विकास निधी हा जनतेचा पैसा असून तो जनहितासाठी खर्च होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!