शिक्षण

RTE प्रवेश : पुणे जिल्हा व शहरात 9,373 विद्यार्थांना मोफत प्रवेश


­अनिरुद्ध देशपांडे,                                                            पुणे प्रतिनिधी.

पुणे : RTE प्रवेश प्रक्रियाच्या तरतुदीनुसार पुणे  जिल्ह्याच्या ग्रामीण भाग व शहरी भागातील मिळून आतापर्यंत 9 हजार 373 विद्यार्थांना विविध शाळांमध्ये  मोफत प्रवेश मिळाले आहेत. या कायद्यातील तरतुदीनुसार निवड झालेल्या एकूण विद्यार्थ्या पैकी 934 विद्यार्थ्यांचा अपुर्ण कागदपूर्ततेमुळे प्रवेश नाकारण्यात आला असून, अन्य 40 विद्यार्थ्यांची निवड होऊनही पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित शाळांशी संपर्क केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्या व शहरातील एकूण 16 हजार 337 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या सर्व विद्यार्थ्यांना एकूण 970 शाळांमध्ये हे मोफत प्रवेश दिले जाणार होते. त्यापैकी आतापर्यंत 9  हजार 373 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी  संजय नाईक यांनी सांगितले.

Advertisement

पुणे शहरातील प्रवेश घेतलेले विद्यार्थी :                             पुणे शहर – 098, औंध –  785, बिबेवाडी – 615, हडपसर – 664, येरवडा – 350, आकुर्डी – 1002, पिंपरी – 588.

जिल्ह्यात प्रवेश घेतलेले तालुकानिहाय विद्यार्थी :               आंबेगाव – 87, बारामती – 376, भोर- 70, दौंड – 177, हवेली – 2436, इंदापूर – 270, जुन्नर – 198, खेड – 559, मावळ –  471, मुळशी – 50, पुरंदर – 123, शिरूर- 454 आणि वेल्हा (राजगड) तालुक्यात एकाही विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच काही शाळा  विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचे आढळून आले तर संबंधित शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी  संजय नाईक यांनी सांगितले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!