भोर दिक्षाभूमी स्मारक समितीत बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
भोर : भोर दिक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित उपस्थिततांना खीर वाटप करण्यात आले. तसेच बौद्ध आणि भीम गीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमाला भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. सामाजिक एकोपा, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल सावंत, युवक अध्यक्ष आरपीआय (आठवले गट), प्रकाश ओव्हाळ अध्यक्ष भोर तालुका आंबेडकरवादी युवा, सागर यादव राष्ट्रीय रिपब्लिकन सेना भोर तालुका अध्यक्ष यांनी केले होते. कार्यक्रमास भोर तालुक्यातील ज्येष्ठ मान्यवर माने सर, महेंद्र साळुंखे भिम आर्मी अध्यक्ष आणि आकाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बुद्धांच्या विचारांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या संदेशाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त झालेल्या या सोहळ्याने भोरमध्ये ऐक्य, संस्कार आणि सामाजिक जाणीवेचा सकारात्मक संदेश दिला.




