ताज्या घडामोडी

बालदिनानिमित्त भोंगावलीत चिमुकल्यांसाठी रंगला ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या’चा नाट्याविष्कार


सारोळा : बालदिनाचे औचित्य साधून भोर तालुक्यातील भोंगावली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या’ या विशेष बालनाट्य प्रयोगाने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या अभिनव सांस्कृतिक उपक्रमाला लहान मुलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रामीण भागातील मुलांना केवळ मनोरंजनाची संधी न देता त्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा मिळावी, कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा, या उद्देशाने या बालनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यप्रयोगातील रंजक प्रसंग, खुसखुशीत संवाद आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने चिमुकले अक्षरशः भारावून गेले. प्रत्येक प्रसंगाला मुलांनी हशा, टाळ्या आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांना दाद दिली.

Advertisement

शालेय शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन मुलांना अनुभवातून शिकण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. नाटकासारख्या कलामाध्यमातून मुलांना मनोरंजनासोबतच विचार करण्याची, निरीक्षण करण्याची आणि नव्या गोष्टी समजून घेण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे बालमनातील कल्पकता, आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारांची क्षमता विकसित होण्यास हातभार लागतो.

समता प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्यांना दर्जेदार कलानुभवाची मेजवानी मिळाली असून, बालदिनाचा आनंद अधिकच द्विगुणित झाला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!