ताज्या घडामोडी

भोर तालुका बारावीचा निकाल ८८.३३% ! १००% निकलामध्ये तालुक्यातील ५ महाविद्यालयांचा समावेश


भोर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून यंदाचा एकूण निकाल ८९.७९% लागला आहे

भोर तालुक्याचा निकाल ८८.३३ टक्के लागला आहे. यावर्षी २ हजार २११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी १ हजार ९५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ६७ विद्यार्थी उच्चतम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ५०४ द्वितीय श्रेणीत ११०१, तर पास श्रेणीत २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

१००% निकालामध्ये १) जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल (१००) २) अमृत विद्यालय बनेश्वर (१००) ३) गर्ल्स हायस्कूल भोर (१००) ४) युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल (१००) ५) सरदार कान्होजी जेधे औद्यागिक प्रशिक्षण संस्था, भोर (१००) या महाविद्यालयांचा समावेश आहे.

Advertisement

इतर महाविद्यालय राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (९१.६८), श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जुनिअर कॉलेज (८३.२४), श्री शिवाजी कॉलेज नसरापूर (७२.३४), अनंतराव थोपटे महाविद्यालय (७५.७५), गर्ल्स जुनिअर कॉलेज (८८.२३), न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड जुनिअर कॉलेज संगमनेर (५८.३३), सरनोबत सिदोजी थोपटे माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय, खानापूर (८७.०९), दिनकरराव धाडवे पाटील माध्य व उच्च माध्य. विद्यालय, सारोळे (८४.२१), क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय (७५), राजगड जुनिअर कॉलेज धांगवडी (९७.५३), नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडिअम स्कूल (९९.२०), आरआर (३८.३८), श्री छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज (९१.३०), अनंतराव थोपटे कॉलेज (९४.११) इतका टक्के निकाल लागला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!