पुरंदरचा सुपुत्र शहीद ! जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण !! घनश्याम आढाळगेच्या जाण्याने तालुक्यात शोककळा
सासवड : देशाच्या सीमेवर ड्युटी देताना पुरंदर तालुक्यातील जाधववाडी (दिवे) येथील जवान घनश्याम आढाळगे यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण प्राप्त झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण पुरंदर तालुक्यात शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवरील चकमकीदरम्यान त्यांनी शत्रूला मुस्कारा देत प्राणांचे महान बलिदान दिले. शहीद आढाळगे हे धाडसी, कर्तबगार जवान म्हणून ओळखले जाणारे होते. त्यांच्या वीरमरणाने मातृभूमीचा एक धीर गटलेला असल्याची भावना सर्वांमध्ये आहे.
शहीद घनश्याम आढाळगे यांचे पार्थिव आज मूळ गावी आणले जाणार असून, जाधववाडी (दिवे) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ग्रामस्थ, स्थानिक नेते व शासन अधिकारी उपस्थित राहणार असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
या सुपुत्राच्या वीरतेमुळे वडील, आई, कुटुंबीय व गावकऱ्यांवर शोकाचा डोंगर कोसळला आहे. पुरंदर तालुक्यातील प्रत्येकजण त्यांच्या बलिदानाला सलाम करत असून, ‘अमर रहे शहीद की जय’ असा घोष देत हळहळ व्यक्त करत आहे. राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या पराक्रमी जवानाला विनम्र आदरांजली.




