ताज्या घडामोडी

भोर एस टी बसस्थानकामध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला


भोर : भोर एसटी बस स्थानकाजवळील पाण्याच्या टाकी शेजारी आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार भोर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.

मृतदेह ४५ ते ५० वर्षे वयाचा असावा असे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. मृतदेह गोरा रंगाचा, दाढी असलेला असून, अंगावर कोणतेही कपडे नसल्याचे दिसून आले. त्याच्याकडे ओळख पटेल असा कोणताही पुरावा किंवा ओळखपत्र सापडलेले नाही.

Advertisement

एस टी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांना सकाळी हा मृतदेह आढळला असता त्यांनी तात्काळ भोर पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आतापर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच काही गोष्टी स्पष्ट होतील.

पोलिसांनी आवाहन केले आहे की, हा मृतदेह कोणाच्या ओळखीचा किंवा नातेवाईकाचा असल्यास भोर पोलिस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!