ताज्या घडामोडी

मा.आमदार संग्राम थोपटेंसाठी भाजप मैदानात ! आमदार शंकर मांडेकरांना शिंगावर घेण्याची तयारी !! महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर


नसरापूर : राज्याच्या राजकारणात महायुतीत सोबत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भोर तालुक्यात उघड संघर्ष पेटला आहे. काँग्रेसमधून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्यातील श्रेयवादाने विकोपाची स्थिती निर्माण झाली आहे.

संघर्षाची पार्श्वभूमी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून सुरू झालेला हा वाद आता विकासकामांवर केंद्रित झाला आहे. भोरमधील छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षे प्रलंबित असलेल्या या संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी शंकर मांडेकरांनी उपलब्ध करून दिला असल्याचा दावा करत त्यांनी संग्राम थोपटेंवर टीका केली.

आमदार शंकर मांडेकरांची आक्रमक भाषा
छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलन उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मांडेकर म्हणाले, सत्तेत असूनही विरोधकांनी काहीच केले नाही. आम्ही निधी दिला तरी माझ्या नावाने दमदाटी होते. मी सरळ असलो तरी वाकडाही आहे. तुमची राजेशाही घरी ठेवा. अंगावर आलात तर सोडणार नाही. धमकी असेल तर वेळ-ठिकाण सांगा. मुळशीतील त्यांच्या ‘कॅरेक्टरची’ चौकशी करण्याचा सल्ला देत, कोणाच्या बापाला घाबरत नाही असा इशारा त्यांनी यावेळी थोपटेना दिला होता.

Advertisement

भाजपचा पवित्रा
आमदार शंकर मांडेकरांच्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजप नेत्यांनी आज नवसह्याद्री कॉलेज नायगाव येथे पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके आणि पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, बाळासाहेब गरुड, संतोष धावले, धनंजय इंगुळकर, आदित्य बोरगे आदी उपस्थित होते. त्यांनी मांडेकरांची वरिष्ठ पातळीवर तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले. माजी मंत्री अनंतराव थोपटे व संग्राम थोपटेंनी त्यांच्या कार्यकाळात मोठा निधी आणून शिक्षण संस्थांद्वारे हजारो विद्यार्थी घडवले असल्याचे सांगितले.

दादागिरीचे आरोप
भाजप नेत्यांनी आमदार मांडेकरांच्या भाषणाला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे संकेत असल्याचे म्हटले. आमची संस्कृती दादागिरीची नाही. त्यांच्या पातळीवर जाणार नाही. पण या मातीत अनेकांना शिंगावर घेण्याचा इतिहास आहे, असा सूचक इशारा दिला आहे. “कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे म्हणणाऱ्या मांडेकरांना थोपटेंसाठी भोर भाजपा मैदानात उतरली असुन या वादाने महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून भोरच्या राजकारणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!