ताज्या घडामोडी

धनशक्तीला नाही, जनशक्तीला साथ द्या ! काँग्रेस उमेदवार वैभव धाडवे यांची मतदारांना भावनिक साद


सारोळा : जिल्हा परिषद गट निवडणुकीत काँग्रेस उमेदवार वैभव सखाराम धाडवे यांनी प्रचारादरम्यान मतदारांना भावनिक साद घातली. धनशक्तीविरोधात जनशक्तीची असल्याचे ठामपणे सांगितले. “राजकारण हे विचारांचे असले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व्हावे. मात्र सध्या चुकीच्या पद्धतीने प्रचार होतोय, अशा राजकारणाला बळी पडू नका,” असे आवाहन केले.

धाडवे म्हणाले, “ही निवडणूक वैयक्तिक नाही, तर सामान्य माणसाच्या हक्कांची आहे. जनतेच्या विकासासाठी मला जनशक्तीचा आशीर्वाद मिळावा.” हाताचा पंजा चिन्हावर मतदान करण्याचे स्पष्ट आवाहन केले.

Advertisement

“जर मी जिल्हा परिषद सदस्य झालो, तर तुम्हीच सर्वसामान्य जनता जिल्हा परिषद असाल. तुमचा आवाज प्रामाणिकपणे पोहोचवेन. विकास कामांत भेदभाव न करता सर्वांना न्याय देईन,” असा निर्धार व्यक्त केला

शेवटी भावनिक साद घालत ते म्हणाले, “एकदाच मला संधी द्या. त्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही. भोंगवली-कामथडीचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे.” मतदारांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!