वेळ-नसरापूर जिल्हा परिषद गटात मोठी उलथापालथ ! शिंदे गटाचे नेते बाळासाहेब जायगुडे यांचा भाजपात प्रवेश
भोर : वेळू-नसरापूर गटात राजकीय भूकंप झाला असून, शिंदे गटाचे नेते व केळवडे गावचे माजी सरपंच बाळासाहेब जायगुडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा उंचावला. राजगड साखर कारखान्याचे कामगार नेते म्हणून ओळख असलेले जायगुडे यांनी शिवसेनेत असताना सरपंचपदावर पाच वर्षे यशस्वीपणे पार पाडले. ते केळवडे विविध कार्यकारी सोसायटीचे सध्याचे सदस्य आहेत.
Advertisement
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्याने प्रभावित होऊन हा प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची वेळू-नसरापूर गटातील ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांत त्यांचा फायदा होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
यावेळी भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले, रोहन बाठे, महेश टापरे, शैलेश सोनवणे,माऊली पांगारे,आदित्य बोरगे, रणजीत बोरगे, सोपान कोंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते
Advertisement




