ताज्या घडामोडी

जयश्री शिंदेची भोर उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड


भोर : अनुभवी नेत्या जयश्री शिंदे यांची भोर उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेच्या बैठकीत ही निवड एकमताने झाली. याआधी जयश्रीताई नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या आणि विविध विकास कामांना चालना दिली होती.

मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्रीताईंनी रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता मोहिमा आणि उपनगरातील मूलभूत सुविधांसाठी अथक प्रयत्न केले. भोर नगरपरिषद मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

Advertisement

शांत, स्वयमी आणि अभ्यासू असे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व स्थानिक राजकारणात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे. निवडी वेळी उपस्थित नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.

जयश्रीताई म्हणाल्या, “नागरिकांच्या विकासासाठी मी निष्ठेने काम करेन. संग्रामदादाच्या नेतृत्वात भोर शहराला नव्या उंचीवर नेण्यास मदत करेन.” निवडी बद्दल त्यांनी मा. संग्राम थोपटे विद्यमान सर्व नगरसेवक,भोर भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

ही निवड भोरच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वास यावेळी भाजपा कार्यकर्ते यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!