नगरपरिषदा-नगरपंचायत निवडणूक ! उद्याची मतमोजणी रद्द !! हायकोर्टाचा मोठा निर्णय !!! निकालाची नवी तारीख २१ डिसेंबर
नागपूर: महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल रद्द करण्यात आले असून, महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल जाहीर करण्याची नवी तारीख 21 डिसेंबर 2025 ठरवली आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करून निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या वर्षी जवळपास 20 नगरपरिषदांमध्ये मतमोजणी पुढे ढकलण्यात आली होती कारण न्यायालयीन अडचणींमुळे मतदानावर कारवाई सुरू होती. ही निवडणुक 20 डिसेंबर रोजी पूर्ण होणार होती, परंतु आता निवडणुकांच्या निकालासाठी प्रशासनाला 21 डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच 20 डिसेंबर एका दिवशी मतदान झाले तरी या दिवशीच निकाल जाहीर होतील.
न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया अखंड आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावी यासाठी आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत लागू ठेवण्याचा आदेश दिला आहे. निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांना पूर्वीचे चिन्ह कायम राहील, पण त्याठिकाणी खर्च वाढवण्यास न्यायालयाने परवानगी दिली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावर मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे निवडणूक प्रक्रिया कठीण झाल्याची टीका केली आहे. त्यांनी निवडणूक संचालनात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही यावेळी पुनरुच्चार केला.
या आदेशामुळे प्रशासन आणि पोलिसांना Stronge Room तसेच मतमोजणी केंद्रांची सुरक्षितता 21 डिसेंबरपर्यंत टिकवून ठेवावी लागणार आहे. सुमारे 280 पेक्षा अधिक ठिकाणी ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, त्यामुळे पोलिस बंदोबस्तातही वाढ करावी लागणार आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना रोज Stronge Room मध्ये जाऊन तपासणी व स्वाक्षरी करणे बंधनकारक असल्याने प्रशासनासाठी हा निर्णय मोठा आव्हान ठरणार आहे.
नवीन निकाल जाहीर होण्याच्या तारखेने निवडणूक वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, निवडणूक कायदेशीरदृष्ट्या आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला तसेच निवडणूक आयोगाला आता अधिक जबाबदारीने काम करावे लागेल.




