राजकीय

कासुर्डी (गुंजन मावळ) येथे दिवाळी निमित्त फटाका किट वाटप


 

कापूरहोळ (प्रतिनिधी) : मा. विक्रम खुटवड यांच्या प्रेरणेतून व सौ. वैशाली गाडे यांच्या संकल्पनेतून भोर तालुक्यातील कामथडी गणातील कासुर्डी गुंजन मावळ कातकरी वस्ती येथे दिवाळी सणानिमित्त फटाका किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन राहुल गाडे मित्र परिवार भोर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.

या वेळी राहुल गाडे यांनी उपस्थित मुलांसाठी फटाक्यांचे वाटप करतांना समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वैशाली गाडे यांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी सणाची अनुभूती असल्याचे मत व्यक्त केले.

Advertisement

या उपक्रमामुळे कातकरी वस्तीत उत्सवी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, लहान मुलांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत फटाक्यांच्या रोषणाईत हर्षोल्हासाने सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी राहुल गाडे मित्र परिवारातील सदस्यांनी मनापासून परिश्रम घेतले. स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

या सामाजिक उपक्रमामुळे समाजातील मागास घटकांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!