भोर फटाका असोसिएशनची तहसीलदारांकडे लेखी तक्रार ! अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
भोर : हिंदू धर्मातील महत्वाचा म्हणजे दिवाळी, हा सण संपुर्ण भारतात मोठया उत्सवात सर्वसामान्या पासुन गर्भ श्रीमंतांपर्यंत साजरा होणारा सण आहे, दिवाळीत फराळ, नवीन कपडे, विविध खरेदीबरोबरच फटाक्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. प्रशासनाच्या नियमानुसार सर्व बाबींचे काटेकोर पालन करूनच फटाके विक्री करणे आवश्यक असते, किरकोळ विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी-मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भोर फटाका असोसिएशनी तहसीलदारांकडे लेखी पत्रा द्वारे केली आहे.
दिवाळीत फटाके विक्रीसाठी प्रशासकीय परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कर्कश आवाज करणारी फटाके विक्री करू नये. भोर शहरासह तालुकयामध्ये विनापरवानगी फटाके विकले जात असल्याने त्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी या मागणीचे लेखी पत्र आज रविवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी भोर फटका असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष भारतयो यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन भोर तहसिलदार राजेंद्र नजन यांच्याकडे देण्यात आले आहे.
∆ सर्व फटका स्टॉल धारक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियोजित जागेतच फटाक्यांची विक्री करतो. आम्ही सर्व नियमांचं काटेकोर पालन करतो. मात्र भोर तालुक्यातील काही गावांमध्ये काही ठिकाणी खुलेआम, तर काही छुप्या पद्धती विना परवाना फटाके विक्री जात आहे, यामुळे आकडून ठरवून दिलेल्या नियामवली पाळणाऱ्या स्टॉल धारकांना याचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
संतोष भरतयो,
कार्याध्यक्ष : भोर फटाका असोसिएशन.
मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. ॲटम बॉम्ब शिवाय धूर सोडणारे, मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना बंदी आहे. तरी ही भोर शहरात व तालुक्यात याची सरास विक्री केली जात आहे.
सुरेश तुपे,
उपाध्यक्ष भोर फटाका
असोसिएशन.
यावेळी अध्यक्ष संतोष भरतयो, उपपाध्यक्ष सुरेश तुपे, खजिनदार कन्हेंचा मुजर, सचिव साजिद आसार यांच्यासह भोर फटका असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.




