ताज्या घडामोडी

भोर महसूलची क्यूआर कोडद्वारे संपर्क यंत्रणा कार्यान्वित ! नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा : आमदार शंकर मांडेकर


भोर :  महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नाही किंवा ते भेटत नाहीत, महसूल विभागाच्या अश्या अनेक तक्रारी आहेत. सर्वसामान्य लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी दि.२५ सप्टेंबर (गुरुवार) रोजी भोर महसूल विभागाने व्हाट्सअप क्यूआर कोडद्वारे संपर्क करण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या अभिनव उपक्रमाचे लोकार्पण पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र ड्डडी यांच्या हस्ते व भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

ग्राम महसूल अधिकारी यांना दोन तीन गावांचा कारभार बघावा लागतो. महसूल विभागाची बैठक आणि नियमित कामकाजामध्ये ही मंडळी व्यस्त असतात. सात-बारा, पीक पाणी, राहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, घराच्या आणि जागेच्या नोंदी, शिधापत्रिका, तसेच विविध कामासाठी लागणारे दाखले हे अधिकारी देतात. पण अनेकवेळा या किरकोळ कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनातून तहसिल  कार्यालयात त्यांचा स्वतःचा आणि तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्या व्हाट्सअप क्यू आर कोड असलेला फलक लावला आहे. सध्या सर्वच लोकांच्याकडे आधुनिक मोबाईल आहेत. त्यामुळे हा क्यू आर कोड वापरून त्यांना सहज संपर्क करता येणार आहे.

Advertisement

सर्वसामान्य नागरिकांना ग्राम महसूल अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे लवकर दाखले मिळत नाहीत. नोंदी रखडल्या रखडतात अशा अनेक तक्रारींची दाखल घेतली जावी. पारदर्शक कारभाराद्वारे कामांचा लवकर निपटारा व्हावा, कामाला आधुनिक तंत्राद्वारे गती द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.                                               शंकर मांडेकर.
आमदार : भोर-राजगड (वेल्हा)- मुळशी.

यावेळी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मा. भोर पंचायत समिती उपसभापती विक्रम खुटवड, मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संतोष घोरपडे, किरण राऊत, भगवान पासलकर हे मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!