आज्ञाताने घराजवळ लावलेली चारचाकी गाडी फोडली
कापूरहोळ : दि. 29/11/24 (शुक्रवार) अक्षय राजेंद्र वाल्हेकर वय वर्ष 28, व्यवसाय शेती रा. कामथडी, ता. भोर, जि. पुणे हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घराजवळ लावलेली चार चाकी गाडी नंबर MH 12 VQ 9222 कोणी अज्ञात इसमाने फोडल्याची घटना घडली आहे.
सदर गाडीची समोरची, साईडची, पाठीमागील काच अज्ञात इसमाने बांबुनी फोडली असुन घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान केलें आहे या संदर्भात अक्षय वाल्हेकर यांनी राजगड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 561/24 BNS कलम 324 (5) या अंतर्गत अज्ञात व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय वाल्हेकर हे सामाजिक क्षेत्रात काम करत असतात, कामथडी ग्रामस्थांनी व त्यांच्या मित्रपरिवारच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे. सदर राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असुन प्रभारी अधिकारी राजेश गवळी सो यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास दाखल अंमलदार पोहवा कोल्हे बच नं. 1860 तपासी अधिकारी सहायक पोलीस फौजदार चव्हाण हे तपास करीत आहेत




