जनतेची कामे करण्यासाठी मी रोज भोर- राजगड मध्ये येणार : शंकर मांडेकर
भोर : दि.१५ शुक्रवार भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. मी जनतेची कामे करण्यासाठी रोज भोर – राजगड मध्ये येईल अशी ग्वाही महायुतीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यानी दिली यावेळी माजी आमदार शरद ढमाले, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, जिवन कोंडे, संतोष घोरपडे,दशरथ जाधव,सुनील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
भोर, राजगड तालुक्यात पर्यटन क्षेत्रात विकास करून रोजगाराला चालना देण्यासाठी प्रयत्न करेन. तालुक्यावर बसलेला मागासलेपणाचा शिक्का पुसन टाकेन. जनतेने निवडून दिल्यास भोर, राजगड मध्ये संपर्क कार्यालय सुरू करून मतदारांच्या समस्म्या तातडीने सोडवून देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही मांडेकर यांनी मतदारांना केली.
या वेळी बोलताना रणजित शिवतरे म्हणाले की ” घराणेशाहीला संपवायचं असेल तर शंकर मांडेकर यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्या. गेली १५ वर्षात जनतेचे काम कोणी केली का ? याचा विचार करून मतदान करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी काय वेळी मतदारांना केले.
धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून समस्या सोडवणार,धनगर समाजावर होत असलेल्या अन्यायाकडे आमदारांनी पाठ केली आहे,पण मी तसं न करता धनगर समाजाचा सोबत खंबीरपणे उभा आहे. अशी ग्वाही मांडेकर धनगर समाज बांधवांना दिली. सकल धनगर समाजाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात मांडेकर यांना जाहीर पाठींबा देण्यात आलाय. या मेळाव्याला माजी आमदार शरद ढमाले, डॉ.शशिकांत तरंगे,अक्षय शिंदे,शांताराम इंगवले, बाबासाहेब कंधारे,विश्वास नाना देवकाते, अमित कंधारे, सूर्यकांत कदम, महादेव मारगळे, शंकर मारगळे, भाऊसाहेब मारगळे,शिवाजी ढेबे,बाळासाहेब झोरे,नामदेव हिरवे,संभाजी गावडे, वैशाली सणस, श्रीकांत कदम,अंकुश मोरे,धैर्यशील ढमाले,शंकर मारणे,राजेंद्र दबडे,राजेंद्र गुंड,अरुण राऊत, आनंद रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.




