सामाजिक

भोर येथे 2024 चा राजगड भुषण पुरस्कार सोहळा संपन्न


भोर : दि. 20/10/24 (रविवार) रोजी राजगड भूषण पुरस्कार 2024 कार्यक्रमाचे आयोजन अनंत निर्मल चॅरटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भोरेश्वर लॉन्समध्ये संपन्न झाला, भोर तालुक्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ वारकरी कीर्तनकार यांच्या उत्तम अध्यात्मिक कार्यातील सेवेचा सन्मान पूर्वक कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.

भोर तालुक्यातील थोर विचारवंत कीर्तनकार व उत्तम सेवा करणारी वारकऱ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता, कार्यक्रमांमध्ये जीवन गौरव पुरस्कार ह.भ.प. मारुतीमहाराज बदक, ह.भ.प. बाळकृष्णमहाराज दसवडकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तसेच ह.भ.प चंद्रकांतमहाराज जगताप ह.भ.प रामभाऊमहाराज रेणुसे यांना वारकरी भूषण पुरस्कार आमदार संग्राम थोपटे व सौ स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते देण्यात आला.

Advertisement

श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायवारी करणाऱ्या 350 वारकऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मान चिन्ह देऊन राजगड पुरस्कर देऊन सन्मान करण्यात आला ते वर्षानुवर्ष करत असलेल्या हरि भक्ति बाबत या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर पंचायत समिती उपसभापती रोहन बाठे, युवा नेते पृथ्वीराज थोपटे, भोर तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच गोरोबा काका पालखी सोहळ्याचे प्रमुख मच्छिंद्र महाराज कुंभार, वैकुंठवाशी परमपूजनीय सणस बाबा आश्रम, जय हरी ग्रुप, भोर-राजगड तालुक्यातील सर्व वारकरी शिक्षण संस्था आणि वारकरी सांप्रदायाचे भक्तगण व पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!