महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे : कुलदीप कोंडे
भोर : दि. 18 ऑक्टोबर 24 (शुक्रवार) भोर तालुक्यातील वर्वे येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेनेचा युवा सेना मेळावा पार पडला, या मेळाव्याला मा. मंत्री विजय शिवतारे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते, यावेळी कुलदीप कोंडे यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या तोंडावर ज्यांचं नाव आहे ते भगवी तोफ,मुलुख मैदानी तोफ ज्यांचे नाव आहे ते महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी,गिरणी कामगारांसाठी समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत.
पुढील 35 दिवसांमध्ये मतदार संघातील लोकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. लोक आपल्याला मतदान करायला इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, त्याची पोचपावती घेऊन पोहोचले पाहिजे, म्हणून शिवसेनेचा कणा युवासेना आहे, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली तर महाराष्ट्र जिंकायला काही अवघड जाणार नाही, युवासेना कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातामध्ये घेतली तर निश्चितच ही निवडणूक जिंकली जाईल.
भोर-राजगड (वेल्हा)-मुळशी मध्ये उमेदवार कुठला असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. उमेदवारी नाकारली तर नाराज न होता समजून जायचं की कदाचित आपण सर्वेमध्ये किंवा त्या निवडून येणे मध्ये कमी पडलो असेल तर निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी मिळणार आहे आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत, गेल्या वेळी आपल्याला धनुष्य बाणाला 1 लाख मते मिळाली होती, धनुष्यबाणापेक्षा समोरच्या उमेदवाराला 1 लाख 8 हजार मते मिळाली होती. म्हणजे त्यावेळी 4000 हजार मतांची गरज होती. आज आपली परिस्थिती चांगली आहे, समोरच्या उमेदवाराची परिस्थिती चांगली नाही, 5/6 दिवसापूर्वी पेपरच्या फेक बातम्या तयार करून पसरवल्या जात होत्या. त्यावेळी भोर तालुक्यातील पत्रकारांनी मीटिंग घेण्याची वेळ आली होती. पत्रकारांची सुद्धा गरज भासते की नाही, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. असे यावेळी कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
यावेळी मेळाव्याला जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, तालुका अध्यक्ष दशरथ जाधव, जिल्हाप्रमुख निलेश घारे,सोमनाथ कुटे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख, दीपक करंजावणे मुळशी तालुकाप्रमुख, स्वप्निल सातपुते मुळशी युवा तालुकाप्रमुख, रेणुका रोकडे युवती सेना तालुकाप्रमुख मुळशी, किरण साळी सचिव युवा सेना, नितीन सोनवणे शहर प्रमुख भोर, गणेश निगडे उपजिल्हाप्रमुख, विकास बापू चव्हाण माजी सरपंच पेंजळवाडी, स्वप्निल गाडे तालुकाप्रमुख भोर, अमित गाडे, किशोर बारणे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




