तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल स्कूल नायगाव येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश
भोर : दि. 18/ 09/ 24 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेज नायगाव येथील विद्यार्थ्यांनी आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज नायगाव स्कूलच्या मुला-मुलींचे मिळून एकूण 6 संघ विजय झाले असुन सांघिक खेळात भोर तालुक्यामध्ये या विद्यार्थ्यांचा दबदबा असल्याचे निदर्शनास आले.
1) 14 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक मिळाला 2) 14 वर्षाखालील मुलांना तृतीय क्रमांक 3) 17 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक 4) 17 वर्षाखालील मुलांना द्वितीय क्रमांक 5) 19 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक 6) 19 वर्षाखालील मुलांना प्रथम क्रमांक या सततच्या कामगिरीच्या जोरावर त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रशिक्षक समीर शेख यांनी स्वराज्य महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल गौरव उद्दगार काढले, सर्वच विद्यार्थी धाडसी, हुशार,मेहनती,प्रभावशाली असल्याचे सांगितले काही सामन्यात तर रोमहर्षक विजय मिळवला, मुला-मुलींनी खेळ चांगला पारखुन खेळला, आज त्यांच्या सुंदर बुद्धिमत्तेचे दर्शन घडले, काही चुकांवर पुन्हा काम करण्याची गरज आहे, आणि ते आम्ही करू,तसेच विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे चेअरमन यांचा असलेला विश्वास व सर्वच कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्य या जोरावर आम्ही हे करू शकलो. या सर्वांचा मी आभारी आहे. आमच्या शाळेचे विजयाची घोडदौड अशीच चालु राहील अशी आशा करुन जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न करू असे सांगितले.




