शिक्षण

RTE प्रवेश प्रक्रियाकरिता 5 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ


 

पुणे :  RTE (शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत) शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 23 ते 31 जुलै पर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत बुधवारी संपली , या मुदतीत 39 हजार 407 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. मात्र अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या करिता 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागा ­कडून देण्यात येत आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षण विभागाने फेब्रुवारी मध्ये RTE प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवली होती, ­शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला होता, त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वी प्रमाणेच RTE प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे 2 महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला खुप उशीर झाला आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) खासगी शाळांतील 25  टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!