क्राईम

रणजित निंबाळकर खुनातील आरोपी शहाजी काकडेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला


पुणे : बारामती दि. 22/7/24 (सोमवार ) 27 जुन रोजी      रणजीत निंबाळकर सरांचा खून झाला होता, या प्रकरणातील प्रमुख आरोपी शहाजी काकडेचा प्रत्यक्ष जरी सहभाग नसला, तरी आरोपीचे कृत्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असुन त्याच्यावर असणारे मागील गुन्हे त्याच्या विरुद्ध असणारी खुन प्रकरणातील परिस्थिती, पुरावा नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न.

Advertisement

सदर आरोपीने केलेले कृत्य, गंभीर स्वरूपाचे आहे, घटनेचा तपास चालू असून आरोपीला जामीन मंजूर केला तर त्याचा संपुर्ण प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, काही पुरावे नष्ट होऊ शकतात, अशा अनेक कारणांमुळे माननीय कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

या निर्णया बाबत अंकिता रणजीत निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले व माननीय कोर्टाचे, वकिलांचे आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!