शिवसेना नेत्यावर नाही तर शिवसैनिकांच्या जीवावर चालते : माऊली शिंदे भोर ता.प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा.)
केळावडे : भोर तालुका शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्ष्याचे माजी जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्ष्यात प्रवेश केला असल्याने त्या विषय माहिती देण्यासाठी आज दि. 21/4/24 (रविवार) रोजी माऊली शिंदे यांची पत्रकार परिषद घेतली.त्यामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितले की कुलदीप कोंडे चा शिंदे गटात प्रवेश म्हणजे आम्हां शिवसैनिकांना मोठा धक्काच होता, कोठलीही चर्चा न करता त्यांनी स्वतःच्या राजकीय महत्व काकंशेपोटी घेतलेला निर्णय आहे. त्यांनी जरी प्रवेश केला असला तरी तालुक्यातील सर्वच सेल चे पदाधिकारी व सच्चा शिवसैनिक माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच आहेत.
कोणा एका नेत्याने पक्ष सोडला म्हणजे भोर तालुक्यातील शिवसेना संपली असे होत नाही, तर शिवसेना अधिक जोमाने वाढेल. काही माजी पदाधिकरी पक्ष सोडुन गेलेले पुन्हां शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Advertisementआत्ता आम्हांला मातोश्रीहुन जो आदेश येईल तोच आम्ही पाळणार, सच्या शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बरोबर असुन वेळ प्रसंगी स्वतः अंगावर केसेस घ्यायला तयार आहे.
कुलदीप कोंडे यांना पक्षाने 2 वेळी आमदार 2 वेळी जिल्हा परिषदचे तिकीट दिले, जिल्हा संघटक केले,तरी देखील त्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी गद्दारच्या पक्षात प्रवेश केला.
मी ही माझी इच्छा सांगतो की पक्षाने आदेश दिले तर मी आमदारकी लढवू शकतो. काही जण बोलतात आम्ही महायुतीला 50 हजारचे मताधिक्य आम्ही ते महायुतीला देऊ. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे, हे मतदान तुमचे एकट्याचे नसुन शिवसैनिकांचे आहे, आणि आम्ही सर्व शिवसैनिक महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना 50 हजारचे मताधिक्य देऊ.
यावेळी दिपक दामगुडे,दत्तात्रय जाधव, दशरथ गोळे, पोपट जगताप, अनिकेत शिंदे, निशाताई सपकाळ तसेच विविध सेलचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.




