ताज्या घडामोडी

30 वर्षांपूर्वी सुरु केलेली विनाथांबा एसटी बस बंद : भोर डेपो प्रशासनाचा निर्णय


सुनील सावंत,
प्रतिनिधी.

भोर : भोर एसटी बस स्थानकातून पुण्याला दररोज जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग, इतर प्रवाशी यांच्या सोईसाठी 30 वर्षापूर्वी सुरू केलेली भोर ते स्वारगेट विनाथांबा एसटी बस सेवा प्रशासनाने उत्पन्नात घट झाल्यामुळे बुधवार पासून करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे नोकरी, व्यवसाय व इतर कारणाने पुण्याला येणाऱ्या- जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांमध्ये अगोदरच तीव्र संताप असताना विनाथांबा बससेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये अधिक नाराजी आली आहे. सध्या येथील एसटी सेवा बेभरवशाची झाली आहे.

Advertisement

विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी यांच्या मागणीनुसार 30 वर्षापूर्वी सकाळी आणि सायंकाळी अशा विनाथांबा 2 बस सुरू केल्या होत्या. प्रवाशांची वाढती संख्या आणि बसचा प्रतिसाद विचारात घेऊन अधिक बस सुरू झाल्या. सध्या दिवसभरात 24 विनाथांबा बस फेऱ्या सुरू होत्या. तसेच भोर डेपोतून जातांना प्रवासी संख्या जास्त असते परंतु स्वारगेट होऊन भोरला येताना प्रवासी खूपच कमी असतात या कारणामुळे एसटी डेपो तोट्यामध्ये जात आहे, तसेच कोरोना काळा पासून भोर एसटी डेपोला दिवसेंदिवस आर्थिक तोटा वाढत होता, असे प्रशासनाचे आहे. या निर्णयामुळे रोज अप-डाउन करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!