सामाजिक

हिंदु-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक असणारी हज यात्रा


दौंड प्रतिनिधी.                                                         चेतन सुर्यवंशी.

वाखारी : पुणे जिल्यातील दौंड तालुक्यात वाखारी गाव असुन या गावातील संपुर्ण हिंदु बांधव हज यात्रेला जातात, या यात्रेला 1100 वर्षांची परंपरा आहे.

ही हज यात्रा अरबमधील मक्का-मदीना नसुन वाखारी गावातील हजरत शादावली बाबा दर्गा ते केडगाव मधील चांदतारा मजिद पर्यंत असते. या दर्ग्याचा मुख्यमान रोज्याच्या माळ्यातील शेळके कुटुंबीयांना असतो,

परंपरेनुसार हे हिंदु बांधव हज यात्रेला निघतात,ज्या दिवशी जायचे आहे, त्या दिवसाच्या एक दिवस आगोदर दर्ग्यात एकत्र येतात रात्री सर्वजण येथेच मुक्काम करतात, व झोळीची पुजा करतात,

Advertisement

सकाळी सर्वजण लवकर उठतात, आंघोळ झाल्यानंतर उपवास धरतात, ज्यांची लग्न झाली आहेत असे पुरुष झोळी घेऊन वाखारी-केडगाव परिसरात भिक्षा मागायला जातात.गोळा झालेल्या भिक्षाचा महिला भगिनी मलिदा तयार करतात,त्याच मलिदयाचा नैवेद्य मजिदमध्ये दाखवला जातो आणि फात्या दिली जाते.

हा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हां वाखारी येथील दर्ग्यात जातात. तेथे गेल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धान्याचा महाप्रसाद तयार करुन सर्व गाव उपवास सोडतात.

अशा पद्धतीने या हज यात्रेचा समारोप होतो.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!