महायुतीच्या आदेशाची वाट न पहाता ; किरण दगडे पाटील आज भरणार उमेदवारी अर्ज
भोर : भोर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे, भाजपाचे युवा नेते किरण दगडे पाटील आज 28/10/24 सोमवारी महायुतीच्या घटक पक्ष व मित्र पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत, ते सकाळी ग्रामदैवताचच्या चरणी नतमस्तक होऊन महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करणार असून त्यानंतर रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडून अनेकांनी भोर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे भोर विधानसभेमध्ये इच्छुकांची संख्या पाहता या मतदारसंघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
भोर विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे आहेत. त्यामुळे आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित होते, तशा आशयाचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच केले होते. आणि त्यास अनुसरून संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचारामध्ये भोर विधानसभेतील प्रत्येक वाडी रस्त्यावर,गावोगावी प्रचारात आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे,
महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे माजी पुणे जिल्हा परीषद सदस्य कुलदीप कोंडे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेत चांदेरे हे इच्छुक असुन त्यांनी हा आपापल्या परीने पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, महायुतीत भाजपचे किरण दगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे हे इच्छुक आहेत, व त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केलेली आहे,
महायुतीत ही जागा पारंपारिक शिवसेनेची असल्याने कुलदीप कोंडे हेच प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे, तसेच माहितीत भाजपाचे युवा नेते किरण दगडे पाटील यांच्याकरिता ही जागा शिवसेना भाजपाला सोडते की राष्ट्रवादीच्या रणजीत शिवतरे यांना सोडते, का स्वतः कडेच ठेवते हे पाहावे लागेल.
भाजपाचे युवा नेते किरण दगडे पाटील पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता फॉर्म भरणार असल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये कुजबुज आहे, की किरण दगडे पाटील हे बंडाची भूमिका घेणार की त्यांना पक्षाचा “AB”फॉर्म दिला जाणार हे अर्ज भरल्यानंतरच समजेल.




