राजकीय

भोर विधानसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज : डॉ. विकास खरात


भोर : गुरुवार दि. 17/10/24 भोर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुधीर खरात यांनी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भोर विधानसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने 203 भोर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार संख्या 4 लाख 21 हजार 554 आहे, त्यापैकी पुरुष मतदार 2 लाख 23 हजार 356 इतकी असून महिला मतदार संख्या 1 लाख 98 हजार 191 इतकी आहे.मतदान केंद्राची एकूण संख्या 564 असून भोर मध्ये 240,राजगड (वेल्हे) – 96, मुळशी – 218, इतकी आहे त्यामध्ये शहरी भागात एकूण 54 मतदान केंद्र असून ग्रामीण भागात 500 मतदान केंद्रे आहेत,

Advertisement

अर्ज दाखल करण्यासाठी 22 ते 29 ऑक्टोंबर सकाळी 11 ते 3 या वेळेत दाखल करू शकता, एका उमेदवाराला 4 अर्ज भरता येतील राजकीय पक्षाच्या उमेदवारांना 1 सूचक लागणार आहे, अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 10 सूचक लागणार आहेत, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथ पत्र देणे बंधनकारक राहणार आहे,  उमेदवाराला अनामत रक्कम 10 हजार द्यावी लागणार आहे, प्रत्येक उमेदवाराला खर्च मर्यादा 40 लाख रुपये इतकी आहे, उमेदवारी अर्ज 22 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी ठेवले जाणार आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या ॲपवर उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात, या संदर्भातिल प्रिंट काढून निवडणूक अधिकारी यांच्याकडे 29 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करणे बंधनकारक राहील. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल याच दिवशी दुपारी चिन्ह वाटप करण्यात येतील, अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर असेल, 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला आयटीआय बिल्डिंग भोर येथे होईल.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!