भोर-महुडे रस्त्याच्या दुरुस्तीचे निकृष्ट काम ! नागरिकांचा वाढता संताप
किवत : भोर-महुडे या मार्गावर चालू असलेले रस्त्याचे खडे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. सध्याचे काम फक्त खडी आणि मुरूम टाकून करण्यात आले असून डांबराचे प्रमाण कमी असल्यामुळे काही दिवसातच रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो.
प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मते योग्य दर्जाच्या साहित्याऐवजी स्वस्त आणि अस्थिर मिश्रण वापरले जात असल्याने वाहन चालकांना ही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) असून शासकीय अधिकारी आणि अभियंते नियमित पाहणी करत असले तरीही कामाचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारलेला दिसत नाही.
जाधव साहेब यांनी या कामावर लक्ष ठेवून निकृष्ट कामाची तात्काळ तपासणी करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत. आणि कामाचा दर्जा बाबत सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.
नागरिकांनी देखील रस्त्याचा दर्जा तत्काळ सुधारावा अशी मागणी केली आहे




