ताज्या घडामोडी

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घयावळ याच्यावर यात्रेतील कुस्ती आखाड्यात हल्ला


प्रतिनिधी,
शिवाजी भाकरे.

धाराशिव : पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावाच्या ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेला असताना यात्रे निम्मित गावात कुस्तीचा आखाडा भरवला होता. याठिकाणी कुस्त्या पाहत असताना निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता.

Advertisement

निलेश घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पहिलवान यांची भेट घेत होते. तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे.

निलेश घायवळवर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. हल्ला करणाऱ्या तरुणाला उपस्थित निलेश गायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यानंतर हल्ला करणारा पहिलवान घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!