क्राईम

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून दोन संघटित टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई


प्रतिनिधी,                                                                  संतोष अडसुळ.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एकुण १८ संघटित गुन्हेगारी 2 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये आत्ता पर्यंत ९८ आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाली.

निगडीतील जाधव आणि पिंपरीतील पवार या दोन टोळ्यावर  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.

Advertisement

निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जाधव टोळीचा प्रमुख जितेंद्र जाधव (वय २३), बबलु मोरे (वय १९), अमन शेख (सर्व रा. ओटा स्कीम, निगडी) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या टोळीवर सात गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीतील आरोपींच्या विरोधात खुनी हल्ला, दरोडा, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, कट रचणे, तोडफोड करणे, विनयभंग करणे, बेकायदारीत्या शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पिंपरीतील पवार टोळीचा प्रमुख अविनाश पवार (वय २८), संतोष चौगुले (वय ३०), माऊली पाटील (वय २७), रंजना चौगुले (वय ५२), यश गरुड (वय १८), निसार शेख (वय २५) आणि रेणुका पवार (वय ३६, सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या टोळीवर ११ गुन्हे केल्याची नोंद आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!