ताज्या घडामोडी

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना रम्मीरत्न पुरस्कार-2025 जाहीर


 

पुणे :  महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे ‘रम्मीरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत पत्ते खेळण्याचा पराक्रम दाखवला आणि महाराष्ट्र सरकारला ‘भिकारी’ संबोधून आर्थिक परिस्थितीची जाहीर कबुली दिली होती.

यावेळी बोलतांना रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले की पुरस्कारमध्ये पत्त्यांच्या डिझाईनने सजवलेली शाल, पत्याचा कॅट, मानपत्र आणि पत्त्यातील गुलाम चित्राचे खास गौरवचिन्ह अशा भव्य स्वरूपात प्रदान केला जाणार आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या अनोख्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे म्हंटले आहे.

Advertisement

रुग्ण हक्क परिषदेच्या या अनोख्या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “हा पुरस्कार म्हणजे केवळ कोकाटे यांच्या रम्मी खेळातील कौशल्याचा सन्मान नाही, तर त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्ते स्वभावाचाही गौरव आहे,” असे उमेश चव्हाण यांनी नमूद केले. हा सोहळा सोमवार, दि. 28 जुलै 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केला असून, यावेळी पत्त्यांचा एक प्रदर्शनीय सामनाही खेळवला जाणार आहे.

कृषीमंत्र्यांचा बिनधास्त आणि स्पष्टवक्ते स्वभाव तसेच रम्मी खेळातील कौशल्याचा हा गौरव आहे, हा सोहळा सोमवार, दि. 28 जुलै 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केला असून, यावेळी पत्त्यांचा एक प्रदर्शनीय सामनाही खेळवला जाणार आहे. राज्यातील आगळावेगळा पुरस्कार सोहळा कसा रंगतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!