कामथडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.निता धनंजय इंगुळकर बिनविरोध
नसरापुर : शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी भोर तालुक्यातील कामथडी गावच्या सरपंच रेशमा विश्वनाथ इंगुळकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेकरिता कामथडी ग्रामपंचायत कार्यालय येथे निवडणुक पार पडली.
नसरापूरचे मंडलाधिकारी प्रदीपकुमार जावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर निवडणूक सहायक म्हणून कामथडीचे ग्रामअधिकारी संतोष गुंडले यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी निता धनंजय इगुळकर यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी जावळे यांनी घोषणा केली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद साजरा केला.
या वेळी मावळत्या सरपंच रेश्मा इंगुळकर, उपसरपंच महादेव मांढरे, सदस्य नितीन इंगुळकर, गुलाब वाल्हेकर, दत्तात्रय वाल्हेकर, सदस्या पल्लवी मांढरे, सविता मांढरे, वैशाली वाल्हेकर, ग्रामसेवक संतोष गुंडले आदी उपस्थित होते.
यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत वडघरचे ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सरपंच पदी निवड झाल्याची गोष्ट करताच गावकऱ्यांनी” त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेचछा दिल्या. आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच निता धनंजय इंगुळकर यांनी दिली आहे.




