क्राईम

कापूरहोळ येथील विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा


कापूरहोळ : विठ्ठल मंदिरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराऊ माता वंशजाच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पार पडला.

पहाटे 5 : 30 वाजल्यापासुनच काकड आरतीने या उत्सवाला सुरुवात झाली, दिवसभर पुजापाठच्या माध्यमांतून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम झाले, रात्री 10 ते 12 यावेळेत श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त भजन झाले,                                          रात्री 12 : 00 वाजता महिला भगिनींनी श्रीकृष्ण जन्माच्या वेळी पाळणा म्हंटला, पाळण्याचे गायन झाल्यानंतर गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय च्या जयघोषात पुष्पवृष्टी सर्व भक्तगणाकडून करण्यात आली.

Advertisement

या कार्यक्रमास रेणुका गाडे,मिना गाडे,संगीता गाडे, अलका देवघरे,मनीषा गाडे.अमृता गाडे,सुमन गाडे, नवनाथ गाडे, प्रवीण देवघरे,महादेव गाडे, ज्ञानेश्वर गाडे, सहदेव गाडे, चंद्रकांत गाडे,बाबू गाडे, सोनू गाडे,रामदास गाडे आधी भाविक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!