ताज्या घडामोडी

कापूरहोळ मध्ये भरली विठ्ठलनामाची शाळा : ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारले रिंगण


कापूरहोळ : एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुले-मुली  पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ घातले होते. नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस घेतली होती. ‘विठ्ठलनामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ प्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी शुक्रवार ४ जुलै २०२५ ला पुणे- बेंगलोर हायवे लगत असलेल्या भोर तालुक्यातील कापूरहोळ गावांमध्ये अवतरले होते.

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक व विठू नामाचा गजर, अशा भक्तिमय वातावरणात ऑक्सफोर्ड इंटरनेशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिंडी व रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होतें, शाळेतील सर्व मुला-मुलींनी वारकऱ्यांच्या वेषभूषा साकारल्या होत्या. कोणी विठोबा तर कोणी रुक्मिणी तर कोणी वासुदेव बनले होते. कापूरहोळ गावामध्ये पालखी सोहळा पार पडताच पंढरपुरच्या वारी प्रमाणेच रिंगण देखील करण्यात आले. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.

Advertisement

विद्यार्थ्यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व विणेच्या तालावर ठेका धरला, तसेच फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था वीर धाराऊ माता तरुण मंडळ व ग्रामस्थांनी केली होती.

यावेळी प्रिन्सिपल उमेश सोनवले सर, जानवी सोनवले मॅम यांच्यासह शिक्षक, शिक्षिका तसेच गावाच्या सरपंच मंगल गाडे, उपसरपंच पंकज गाडे, माजी सरपंच ज्ञानोबा गाडे, माजी सरपंच योगेश गाडे, गोरक्ष आहिरे, रामदास लेकावळे निलेश देवघरे, हेमंत राऊत, सागर गाडे, संग्राम गाडे, शरद म्हस्के, राजेंद्र वाघमारे, महिलांमध्ये निर्मला म्हस्के, मनीषा मोकाशी, माधुरी सपकाळ, रसिका निंबाळकर, अंजली गाडे, सिमा गाडे, तृप्ती राऊत, स्मिता गाडे, कोमल गाडे, रूपाली बरदाडे, कुसुम बाठे, स्वाती वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!