कापूरहोळ मधील साईस्पर्श बिल्डिंगमधून मोटरसायकल चोरी
कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ परिसरात चोरीची घटनांची मालिका कायम असून नुकतीच एका कामगाराची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून लंपास केली आहे. या घटनेची नोंद राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं 388/2025, कलम बी.एन.एस. 303(2) प्रमाणे करण्यात आली आहे.
फिर्यादी संदीप बबन गुजर (वय 42, व्यवसाय-नोकरी), रा. साई स्पर्श बिल्डिंग ए विंग, फ्लॅट नं. 302, कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची काळ्या रंगाची होंडा शाइन कंपनीची दुचाकी (क्रमांक MH12KX3110) कोणीतरी अज्ञात चोरट्याने पार्किंगमधून चोरून नेली आहे.ही घटना दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजेदरम्यान घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित मोटरसायकलची अंदाजे किंमत 30 हजार रुपये असून तिचा चॅसिस क्रमांक ME4JC36JCE7837224 व इंजिन क्रमांक JC36E73351564 असा आहे. फिर्यादी यांनी नमूद केले आहे की त्यांनी आपली मोटारसायकल हँडल लॉक करून सुरक्षितपणे पार्क केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी ती जागेवर नसल्याचे त्यांनी पाहिले.याप्रकरणी पोहवा तळपे (अंमलदार क्र. 2283) यांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपासाची जबाबदारी पोहवा निंबाळकर (अंमलदार क्र. 2317) यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक गवळी स्वतः लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असुन चोरट्याचा माग काढण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून रहिवाशांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीच्या वेळेस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मात्र नागरिकांना शांत राहून संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित देण्याचे आवाहन केले आहे.




