सारोळा येथे दुकानाला मोशन सेन्सर अलार्मची सुरक्षा असल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला
भोर : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सारोळा गावातील प्रसिध्द असणारे एस मार्ट दुकान फोडण्याचा प्रयत्न मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याचा फसला, मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी राजगड पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरट्याचा शोध घेत आहेत.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार एस मार्ट दुकानात दोन चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या पत्र्यामधून दुकानांमध्ये प्रवेश केला होता, परंतु दुकानात बसवलेल्या आधुनिक मोशन सेन्सर आलाराम वाजल्यामुळे त्यांचे चोरीचे मनसुबे धुळीस मिळाले, आलाराम जोर जोरात वाजू लागल्यामुळे गोंधळले चोरटे कोणतेही चोरी न करता पळून गेले.
या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
Advertisement




