शिक्षण

विद्या प्रतिष्ठान भोर येथे विद्यार्थिनीसाठी स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन


भोर : विद्या प्रतिष्ठानमध्ये दि. 22/4/25 ( बुधवार) इयत्ता चौथी ते नववीच्या सर्व विद्यार्थिनीसाठी स्त्री आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्र एच पी व्ही लसीकरण आणि गर्भाशयाच्या ग्रीविकेच्या कर्करोगासंदर्भात होते. मार्गदर्शनासाठी डॉ. म्हेत्रे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

Advertisement

या चर्चासत्रात पालकांनी त्यांच्या विविध शंकांचे समाधान करून घेतले. डॉ. म्हेत्रे मॅडम यांनी एच पी व्ही लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. वयाच्या 9 ते 14 या वयोगटात हे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, जेणेकरून गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका टाळता येईल, सर्वांना ही लस घेण्याचे महत्त्व पटवून दिले. ही लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. लसीकरणासाठी दोन डोस घेतले जातात.या लसीकरणाविषयी पलकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी मादगुडे मॅडम आणि डॉ. म्हेत्रे मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी मादगुडे मॅडम यांनी केले, तर नियोजन अस्मिता कापरे आणि आशा कदम यांनी केले, यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!